जागतिक पर्यावरण दिननिमित्त म्हातोबा टेकडी परिसरात वृक्षारोपण केले

Harshali Mathwad - Corporator, PMC (2017-2022)
वसुंधरेचा प्राण म्हणजे आपला प्राणवायू…कोथरुड भागाचं वैभव म्हणजे आपली “म्हातोबा टेकडी”..
कोथरुड भागातील अनेक नागरिकांच्या उत्तम आरोग्यामध्ये म्हातोबा टेकडीचा वाटा आहे. सिमेंटच्या जंगलामध्ये इतका सुदंर निसर्गाचा भाग आपल्या भागाला मिळाला हे आपलं नशीबच म्हणावं लागेल.
इथला मोकळा शुद्ध ऑक्सिजन, मोरांचे, पक्ष्यांचे आवाज, १२ महिने निसर्गरम्य वातावरणात हे सगळं वैभव जपायला हवं..
आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने म्हातोबा टेकडी येथे आज स्थानिक नागरिकांसोबत निसर्ग सेवा केली.. यात प्रामुख्याने भारतीय प्रजातीच्या झाडांची लागवड करून परिसरातील साठवण तलावातील गाळ व घाण काढुन तलाव स्वच्छ केला.
Comments are closed.