लहानग्यांनी साकारली ‘बाप्पां’ची सुंदर मूर्ती कोथरूडमध्ये शाडूची मूर्ती कार्यशाळा – हर्षाली माथवड यांचा पुढाकार

स्वतःच्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आकार आणि रंग देत लहानग्यांनी शाडू मातीच्या सर्वांगसुंदर अशा गणेशमूर्ती साकारल्या. सर्जनशील हातांना संस्काराची जोड देत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने कोथरूडमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.

कोथरूड विधानसभा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षाली माथवड यांच्या पुढाकाराने कोथरूडमधील डहाणूकर मैदानात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

Comments are closed.