जयाबाई सुतार हॉस्पिटल येथे पुणे महानगरपालिका व महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी डायग्नोस्टिक्स सेंटर
विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व फी साठी मदत.
केंद्र सरकार, राज्यसरकार व पुणे महानगर पालिकेच्या योजनांचा लाभ नागरिकांना
मिळवून दिला.
कोविड काळात परिसरातील नागरिकांना अन्नधान्य वाटप
गेली पाच वर्षे नगरसेविका म्हणून काम करण्याची आपण मला संधी दिली. आपण दाखवलेल्या या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता प्रभागात आपल्याला भासणाऱ्या अनेक अडचणींवर मात करत आपला विश्वास संपादन केला आहे.
तुम्ही दिलेल्या संधीमुळे हे सर्व शक्य झाले असून प्रभागासाठी रस्ते, पाणी, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसोबतच डिग्नोस्टिक सेंटर, भाजी मंडई, विरंगुळ्यासाठी उद्याने, सुरक्षिततेसाठी CCTV, सुशोभीकरण आशी विविध विकासकामे करून नागरिकांना दिलासा देत परिसराचा विकास साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
विविध योजना राबवून प्रभागातील समस्त नागरिकांचे प्रश्न सोडवले असून याची प्रचिती वेळोवेळी आपण दिलेले आशीर्वाद आणि कौतुकाची थाप यामुळे आलीच आहे.
परिसरात फक्त शाश्वत विकास नव्हे तर दैनंदिन कामे करण्यावर देखील भर दिला आहे. ही जनसेवा अविरतपणे अशीच सुरू राहील आणि ज्या समस्या आजवर एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सोडवत आलो त्या इथून पुढेही सोडवण्यास आम्ही तत्पर आहोत.
मा.अध्यक्ष प्रभाग समिती कोथरुड/बावधन
नगरसेविका, पुणे मनपा (२०१७ - २०२२)